Advertisement l Terms of Use l Privacy Policy
ShimpiSamaj.in
Post date : 28/Sep/15 08:36 PM
Post by : ShimpiSamaj.in
दगडूशेठ च्या ३ मूर्तींचा इतिहास !

सन१८९३:-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एकसुप्रसिध्द मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत वसत्यशील प्रस्थ होते.पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची रहावयाची इमारत होती. त्याकाळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथी मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले. त्या घटनेने ते स्वत: वत्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई हे दोघेही व्यथीत झाले. दरम्यानच्या काळात त्यांचे गुरू श्री. माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले की, ”आपणकाही काळजी करू नका, आपण श्री दत्तमहाराज व श्री गणपतीची मुर्ती तयार कराव त्याची रोज पुजा करा व ही दोन दैवतेआपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात
जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्वल करतील”. महाराजांनी सांगितल्या प्रमाणे शेटजींनी श्री दत्त महाराजांची एक संगमरवरी व श्री गणपतीची मातीची मुर्ती बनविली व ती गणपतीबाप्पाची मुर्ती म्हणजेच आपली पहिली मुर्ती होय. ही पहिली मुर्ती आज सुध्दा आपण शुक्रवार पेठेतील अकरा मारूती मंदिरात ठेवलेली आहे व तिची नित्य नियमाने पुजाचालू आहे. ह्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठापना लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होतीआणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठहलवाई, बाबुराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी,श्री. मोरप्पाशेठ गाडवे उर्फ काका हलवाई,नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव,नारायणराव भुजबळ, रामाराव बुटलेर,गणपतराव विठूजी शिंदे, सरदार परांजपे,शिवरामपंत परांजपे, गोपाळराव रायकर,नारायणराव दरोडे यासह सर्व थरातीललोकांनी एकत्र येऊन या समारंभाची मंगलज्योत प्रदिप्त केली. तिच्या मंद पणतेजस्वी प्रकाशात आसमंत उजळून निघाले.भक्तिची धूप आणि श्रध्देची निरांजन लावून
ही जी पुजा त्यांनी केली त्यास सर्व थोरलोकांनी मनोमन आर्शिवाद दिले आणिअशा रितीने ही मंगल परंपरा सुरू झाली.श्रींची पहिली मूर्ती अकरा मारुती चौक येथे आहे.

सन १८९६ :-

सन १८९४ साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली. सन१८९६ साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मुर्ती तयार करण्यात आलीव तिचा उत्सव होऊ लागला. दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. परंतू त्यांनी निर्माण केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी, तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढेसुरू ठेवली. त्याकाळी हा गणपती कै. श्री.दगडूशेठ हलवाई बाहूलीचा हौद, सार्वजनिकगणपती म्हणून प्रचलित होता. या उत्सवाचे व्यवस्थापन सुवर्णयुग तरूण मंडळ करीत होते.सध्या ही मुर्ती आपल्या बाबुराव गोडसे कोंढवा येथील पिताश्री वृध्दाश्रमातील मंदिरात आहे.श्रींची दुसरी मूर्ती कोंढवा येथील बालसंगोपन केंद्र येथे आहे

सन१९६८:-
सन १८९६ साली केलेल्या मुर्तीची थोडीजीर्ण अवस्था झाली होती व सन १९६७ साली आपल्या गणपती बाप्पाच्या अमृत महोत्सव साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर तत्कालीन सुवर्णयुग तरूण मंडळाच्या प्रमुख म्हणजेच सर्वश्री प्रताप गोडसे, दिंगबर रासने,रघुनाथ केदारी, शंकर सुर्यवंशी, चंद्रकांत दरोडे,उमाजी केदारी, प्रल्हादशेठ शर्मा, रमाकांत मारणे, वसंत कोद्रे, कांता रासने, दत्तात्रय केदारी, उल्हास शेडगे, उत्तम गावडे इत्यादी.ब-याचकार्यकर्त्यांनी नविन गणपतीची मुर्तीं बनविण्याचा संकल्प केला व त्यासाठी कर्नाटकचे प्रसिध्द शिल्पकारश्री.शिल्पी यांना पाचारण केले.त्यांच्याकडून लहान मातीची मुर्ती नमुनाम्हणून करून घेतली व श्री. बाळासाहेब परांजपेयांनी प्रोजेक्टर वरून मोठया पडद्यावर कार्यकर्त्यांना दाखविली व सर्वानुमते ती आधीच्या मुर्तीसारखी असल्याची खात् रीपटल्यानंतर प्रत्यक्ष मोठया मुर्तींचे काम सुरू झाले. संपूर्ण मुर्ती तयार झाल्यानंतर श्री.शिल्पी यांनी त्याकाळी जे ग्रहण झालेत्या दिवशी संगम घाटावर ग्रहण संपेपर्यं तदेवाची आराधना केली. श्री. गणेश यंत्राचीपुजा केली व त्यानंतर ज्याठिकाणी मातीची मुर्ती तयार केली, त्या ठिकाणी येऊन विधीवत धार्मिक गणेश याग केला व ते सिध्द श्रीयंत्र मंगलमुर्तीच्या पोटामध्ये सर्वांसमक्ष ठेवले. या मंगलमुर्तीची तुम्हीसर्वांनी दररोज नित्य नियमाने पुजा करा व त्याचे शेवटपर्यंत पावित्र्य राखा असे सांगितले. आजतागायत हे सर्व अत्यंत निठेने व प्रामाणिकपणे सुरू आहे व त्यामुळे आपणासर्वांना त्या गणपती बाप्पाचे आर्शिवादलाभले आहेत. अशा प्रकारे सध्या आपल्यागणपती मंदिरात असलेली श्रींची सर्वांग सुंदर,नवसाला पावणारी व त्याकाळी सुमारे११२५/- (एक हजार एकशे पंचवीस रूपये) ही मुर्ती बनविण्याचा खर्च आला होता.

www.shimpisamaj.in