Advertisement l Terms of Use l Privacy Policy
ShimpiSamaj.in
Post by : ShimpiSamaj.in
Post date : 05/Aug/16
संत शिरोमणी नामदेव महाराज शोभायात्रा व पालखी मिरवणूक भंडारा

भंडारा – श्री.वैष्णव शिंपी समाज  भंडारा द्वारा आज (३१ जुलै) ला संत शिरोमणी नामदेव महाराज यांची ६६६ वी पुण्यतिथी निमित्त भंडारा शहरात त्याची पालकी व भव्य शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली. हि मिरवणूक श्री.संत नामदेव महाराज स्मारक, महिला समाज शाळे समोरून ते संत नामदेव मठ,आझाद वार्ड भंडारा इथं पर्यंत काढण्यात आली. या प्रसंगी समितीचे पदाधिकारी व कार्यकर्तानी ने माल्यार्पण करुन पालकीचे पूजन केले तसेच शोभायात्रे मध्ये भजन मंडळी, लेझिम व ढोल पथक असुन सांस्कृतिक वारसा पुरेपूर  जपण्यात आल... तसेच नामदेव मठात गोपालकाला व किर्तन नंतर  महाप्रसादाचा कार्यक्रम पार पाडण्यात आल. यामध्ये शिंपी समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या प्रचंड बहुसंख्येनी सहभाग घेतला होता. संपूर्ण कार्यक्रम समितीचे अध्यक्ष श्री. योगेशभाऊ ढगे, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आल...

प्रतिनिधी - नरेश चुन्ने