Free Advertisement l Terms of Use l Privacy Policy
Free Registration !!
Shimpi Matrimonial !
Free Registration
"अर्थसंकेत" व्यवसायविषयक वर्तमानपत्र

ISBN No. -

Author/Edited by - श्री. अमित बागवे

Language - मराठी

Publisher - श्री. अमित बागवे

Publisher Contact - 9819499279

Publisher Address - Mumbai

Availability : Online
Price : Rs.260/-Yearly Subscription Charges for mail version from November 2015
Get Enquiry

Descriptions:

अर्थसंकेत  मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसायविषयक  वर्तमानपत्र आहे.

मराठी माणसामध्ये आर्थिक साक्षरतेचा प्रसार व्हावा व मराठी माणसाची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने अर्थसंकेत हे वर्तमानपत्र सुरु करण्यात आले आहे. जवळपास ५ वर्षापूर्वी मराठी स्टॉक मार्केटची निर्मिती करण्यात आली व काळाची गरज म्हणून अर्थसंकेत वर्तमानपत्राची सुरुवात करण्यात आली. या वर्तमानपत्राद्वारे आम्ही अधिकाधिक मराठी भाषिक माणसांना आर्थिक साक्षर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. सध्या हे वर्तमानपत्र ऑनलाईन [e mail and website] उपलब्ध असून जवळपास ३००,००० लोकांपर्यंत पोहोचत आहे. हे वर्तमानपत्र घरातील सर्व सदस्यांना उपयुक्त असे आहे. गृहिणी तसेच वयस्कर व्यक्तींनाही आर्थिक घडामोडी सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपल्या रोजच्या आयुष्यातील वस्तूंची दरवाढ का होते, महागाई म्हणजे काय? व्याजदर का व कधी वाढतो आणि कमी होतो? जगातील आर्थिक घडामोडींचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो? हे व असे सर्व काही आपल्या भाषेत समजून घेता येईल. जेष्ठ अर्थतज्ञ श्री. चंद्रशेखर टिळक यांनी आपले विविध लेख अर्थसंकेतसाठी उपलब्ध करून दिले आहेत. त्याचप्रमाणे इतर विविध तज्ञ व यशस्वी उद्योजकांचे लेख व मार्गदर्शन उपलब्ध होत आहे.

नामदेव शिंपी समाजातील सौ. रचना अमित बागवे पूर्वाश्रमीची रचना लचके ह्या श्री. संतोष गंगाधर लचके ह्यांच्या कन्या आहेत. श्री. संतोष लचके ह्यांचा मुंबई सी एस टी  फोर्ट येथे संतोष इलेक्ट्रोनिक्स नावाने  कॉम्पुटर क्षेत्रात व्यवसाय आहे.     
सौ. रचना लचके बागवे यांचे शिक्षण बी एम एस ,झाले असून, सध्या यु पी एस सी चा त्यांचा अभ्यास सुरु आहे.तसेच त्या अर्थसंकेतचे संचालक व  सहसंपादिका आहेत.त्याचबरोबर "अर्थसंकेत" चे संपादक श्री. अमित बागवे ह्यांच्या त्या पत्नी आहेत. 

facebook:arthsanket


www.shimpisamaj.in

Contact Information

श्री. अमित बागवे / सौ. रचना अमित बागवे
८०८२३४९८२२ / ९८१९४९९२७९ / ९९३००२६०२०
modi street fort Mumbai 400001 Maharashtra

Bank Details

Bank Name / Branch : -
Account No. : -
IFS or IFSC Code : -
DD/MO/Cheque/Net Banking in favour of
-